मुंबई – बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्रीसह अन्य कलाकारांचे काम करताना एकमेकांशी प्रेम जडले आणि अखेर ते विवाहबंधनात अडकले. यातील काही जोड्या खूप प्रसिद्ध आहेत, त्यातीलच एक जोडी म्हणजे प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेत्री शबाना आजमी आणि प्रसिद्ध कवी, गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर होय. त्या दोघांचे लग्न कसे जमले या गोष्ट खूद्द शबाना आझमी यांनी कथन केली.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या विविध प्रकारचे चित्रपट करण्यासाठी ओळखल्या जातात, तसेच त्या खूप गप्पागोष्टी करणाऱ्या आणि बोलक्याही आहेत. शबाना आझमी यांनी यूट्यूबवरील ट्विंकल खन्ना यांच्या चॅट शोमध्ये जावेद अख्तर यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. शबाना यांनी सांगितले की त्यांनी आणि जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्न केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य जावेद अख्तरशी विवाहाच्या विरोधात होते. कारण अभिनेत्रींच्या करिअरसाठी तो काळ खूप कठीण होता.
शबाना आझमी पुढे म्हणल्या की ‘जावेद विवाहित होता आणि त्याला मुले होती, त्यामुळे तो खरोखर कठीण काळ होता. त्याच प्रेक्षकांमधील उलटसुलट चर्चेमुळे आमचे लग्न करणे आणखी कठीण झाले होते. साहजिकच त्या वेळी माझ्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे मी स्वतःला योग्यरित्या सिद्ध करणे. पण मग मी विचार केला की, जर मी काहीही केले तर आणखी जास्त चर्चा सुरू होतील. म्हणून मी गप्प राहण्याचा निर्णय घेतला. मात्र योग्यवेळ आल्यावर सर्वांना कळेल की, आमची भूमिका बरोबर होती. कालांतराने सर्व संकट टळून आमचे लग्न झाले.
यात एक चांगली गोष्ट घडली की, हनी इराणी हीने माझ्याविरुद्ध जावेद आणि तिच्या मुलांच्या मनाला कधीच विष पेरले नाही. एवढेच नाही, जेव्हा मुले लहान होती, तेव्हा हनीने मुलांना आमच्याबरोबर लंडनला पाठवले आणि आमच्यात नात्यात एक बंध निर्माण झाला. त्यामुळेच आज झोया आणि फरहान यांचे माझ्याशी चांगले संबंध आहेत.