लखनऊ (उत्तर प्रदेश) – सध्या देशभरात लव्ह जिहाद प्रकरण खूपच गाजत असून यामुळे धार्मिक संघर्ष देखील वाढत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली असून या घटनेत एका युवतीची फसवणूक करून गैरप्रकार करणाऱ्या तरुणाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. नाव बदलून लग्न करण्याचा प्रयत्न करणे, तरुणीशी मैत्री करणे आणि धर्मांतर करून तेथून पळवून नेणे याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या या तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती देण्याबरोबरच या तरुणाचे काही नेटवर्कशी संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फतेहपूरच्या खखरेरु हद्दीतील कोट येथे राहणारा शरीकुर रहमान काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत गावात आला होता. मुलीच्या पेहरावामुळे ती दुसऱ्या धर्माची आहे, अशी शंका गावातील लोकांना वाटली. दरम्यान शुक्रवारी शफीकुर रहमान या तरुणीचे लग्न करणार होते, मात्र गावकऱ्यांनी याची माहिती पोलीसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना लग्नाआधीच ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
मुलीने पोलिसांना तिचे हिंदू नाव सांगितले. ती बंगालमधील उत्तर चोवीस परगना पोलीस स्टेशन खर्डा येथील रहिवासी आहे. तिने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली, तेव्हा त्याने त्याचे दुसरे नाव सांगितले. मात्र दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तिला फसवून तो पश्चिम बंगाल मधून उत्तर उत्तर प्रदेशात पळून आला. त्यानंतर येथे पोहोचल्यावर तिला त्या तरुणांच्या खऱ्या धर्माची माहिती झाली.
तरूण धर्मांतर करून लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. पोलीसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून या तरुणाविरुद्ध जात आणि धर्म लपवून जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे, ते येथे आल्यानंतर मुलीला त्यांच्या ताब्यात दिले जाईल.