नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडितेच्या घरात स्वतः हिंदू असल्याचे सांगून भाड्याने राहिला. आरोपीने पीडितेचे अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने अत्याचार करतानाचा सुद्धा व्हिडिओ बनवला. त्यानंतर पीडितेला दिल्लीला बोलावून जबरदस्तीने धर्मांतर केले. आरोपी आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तरीही आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने निकाह केला. तसेच तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले.
धमकी देऊन आठ लाख हडपले
आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आठ लाख रुपये आणि दागिने हडपले. बुराडी पोलिसांनी शुक्रवारी पीडितेच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी दिनेश राणा ऊर्फ इनाम अली ऊर्फ दानिश राणा (रा. बुराडी) आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध बलात्कार, फसवणूक, मारहाण, गुन्हेगारी कट रचणे यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. अद्याप आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही. पीडितेला सुरक्षा पुरविली जात आहे.
भाड्याने राहात होता आरोपी
पोलिसांच्या माहितीनुसार, ४० वर्षीय पीडिता मूळ छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे सासर तिथेच आहे. तिच्या सासुरवाडीतील घरात २००५ पासून कैसर नावाचा एक व्यक्ती भाड्याने राहात होता. थंडीच्या दिवसात तो ब्लँकेट विक्री करत होता. त्यासोबत अनेक जण राहात होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये पीडितेच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कैसर दानिश राणा ऊर्फ दिनेश राणा ऊर्फ इनाम नावाच्या व्यक्तीला सोबत राहायला घेऊन आला. दानिशने स्वतःचे नाव दिनेश राणा असून, तो हिंदू असल्याचे सांगितले.
पीडितेला केले ब्लॅकमेल
डिसेंबर २०१९ मध्ये दिनेशने पीडितेचे अंघोळ करतानाचे फोटो काढले होते. त्यानंतर त्याने पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिच्याकडून तो पैसे उकळू लागला. २०१९ ते २०२० दरम्यान आरोपीने पीडितेकडून ३.५० लाख रुपये हडपले. त्यानंतर २०२० मध्ये आरोपीने पीडितेला धमकावून बिलासपूर येथील हॉटेलमध्ये बोलावले. तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
पैशासह शारीरिक शोषण
या व्हिडिओवरून पीडितेला ब्लॅकमेल करण्यासह आरोपी शारीरिक शोषणही करू लागला. आरोपीने एप्रिल २०२१ पर्यंत पीडितेकडून जवळपास ८.५० लाख रुपये आणि सात लाख रुपये हडपले. तीन एप्रिल २०२१ रोजी आरोपीने पीडितेला दिल्लीला बोलावले. पीडिता आपल्या घरातील महिला सहाय्यकासोबत दिल्लीला गेली. तिथे आरोपीने महिला सहाय्यिकेला छत्तीसगढला पाठविले. त्यानंतर आरोपी पीडितेला दिल्लीत वेगवेगळ्या घरात राहू लागला. यादरम्यान आरोपी मुस्लिम असल्याचे पीडितेला कळाले.
आरोपी निघाला दोन मुलांचा बाप
मे २०२१ मध्ये आरोपी पीडितेला बुराडी येथील आपल्या घरी घेऊन गेला. दिनेश ऊर्फ इनाम आधीपासून विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, हे तिला तिथे कळाले. १५ जून २०२१ रोजी पीडितेसोबत जबरदस्तीने निकाह केल्याचा आरोप आहे. त्यामध्ये अनेक लोक सहभागी होते. त्यानंतर पीडितेला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले. पीडितेला पूजा करण्यास मज्जाव केला. १८ ऑक्टोबरला इनाम आणि त्याच्या मित्रांनी पीडितेची छेड काढली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पीडितेचे वकील राकेश कौशिक म्हणाले, की आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेवर अत्याचार केले. धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव आणला. निकाह करताना मुस्लिम बनविण्यासाठी तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले.