इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सामान्यतः दोघांमध्ये प्रेम असेल तर त्यांचे लग्न जबरदस्तीने लावून देण्याची वेळ येत नाही. उलट मियाँ-बिबी राजी तो क्या करेगा काझी असे म्हटले जाते. पण इथे उलट झालेले आहे. बिहारमधील एका गावात एकमेकांवर जिवापाड प्रेम असूनही एका जोडप्याचे जबरदस्तीने लग्न लावून द्यावे लागले.
सारण जिल्ह्यातील एका गावात मनीष आणि आरती यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. चार वर्षे त्यांची लव्ह स्टोरी रंगली होती. एवढेच कशाला याबद्दल दोघांचेही नातेवाईक त्यांच्या प्रेमाबद्दल बरेच काही बोलायचे आणि लग्नाचीही चर्चा करायचे. पण प्रत्यक्ष लग्नाचा विषय निघत नव्हता. अशात आरतीचे लग्न तिच्या कुटुंबियांनी ठरविले होते. तिच्यासाठी स्थळ निश्चित झाल्यामुळे सर्व निश्चिंत होते. पण तरीही आरती आणि मनीषच्या भेटी काही थांबत नव्हत्या. बुधवारी रात्री आरतीच्या गावातील लोक आणि तिचे नातेवाईक मनीषची वाटच बघत बसले होते.
दोघे पुन्हा एकदा भेटले आणि गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे आरती खूपच घाबरली. गावकरी काही शांत बसणार नव्हते. कारण ते या प्रसंगाची बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते. त्यांनी मनीषला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती आसपासच्या गावापर्यंत पोहोचली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. या गर्दीमध्ये मनीषच्या कुटुंबियांचाही समावेश होता. पण मनीषने लग्नाला नकार दिला. प्रेम असतानाही तो नकार का देतोय, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता.
नवीन कपडे आणि लग्न
गावकऱ्यांनी मनीषला मारहाण केल्यानंतर त्याच्यासाठी नवीन कपडे आणले. लग्नासाठी आवश्यक साहित्य मागविण्यात आले. त्यानंतर शेजारी असलेल्या मंदिरात लग्नाची तयारी करण्यात आली. तोपर्यंत मनीषचे कुटुंबीय तिथे पोहोचले. मनीष आणि त्याचे कुटुंबीय लग्नासाठी नकार देत होते. पण गावकऱ्यांनी कुणाचेही न ऐकता जबरदस्तीने लग्न लावून दिले.
Love Affair Boy Friend Village Bihar Saran