नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हास्तरावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. यानुसार जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या वर्षातील जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर्स वाजवण्याची मुभा देण्यात आली असल्याचे जिल्हा दंडाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.
शासकीय आदेशात नमुद केल्यानुसार, केंदीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रणाच्या सुधारीत नियमानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षामध्ये जास्तीत जास्त 15 दिवस निश्चित करून सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्हास्तरावर 2022 या वर्षातील ध्वनीची विहित मर्यादा राखुन सणोत्सवांच्या काळात दहा दिवसांसाठी रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सुरू ठेवता येणार असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे.
या उत्सवांचा आहे समावेश…
1 छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव (शासकीय) 19 फेब्रुवारी 2022 प्रत्येकी एक दिवस
2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 प्रत्येकी एक दिवस
3 गणपती उत्सव 08 सप्टेंबर 2022 गणपती आरास पाहण्यासाठी प्रत्येकी एक दिवस
4 गणेश विसर्जन 0९ सप्टेंबर 2022 मिरवणूकीसाठी प्रत्येकी एक दिवस
5 नवरात्री उत्सव 03 ऑक्टोबर 2022 (दुर्गाष्टमी) प्रत्येकी एक दिवस
6 05 ऑक्टोबर 2022 (दसरा) प्रत्येकी एक दिवस
7 ईद-ए-मिलाद 09 ऑक्टोबर 2022 प्रत्येकी एक दिवस
8 दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 (लक्ष्मीपुजन) प्रत्येकी एक दिवस
9 ख्रिसमस 25 डिसेंबर 2022 (नाताळ) प्रत्येकी एक दिवस
10 नववर्षाचे स्वागतासाठी 31 डिसेंबर 2022 प्रत्येकी एक दिवस