पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर नोटीस काढली आहे. या नोटीसमुळे राणे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहे. दरम्यान भाजपने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी आम्ही हायकोर्टात या नोटीसला चॅलेंज करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाच महिन्यापूर्वीच आम्ही बँकेला लोन सेंटलमेंट करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, डीएचएफएल कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही नोटीस काढण्यात आली आहे. निलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडने ४० कोटींचे कर्ज घेतले होते. पण, कर्जाची परतफेड न केल्यामुळे डीएचएफएल कंपनीने तक्रार केली. त्यानंतर पुणे क्राईम ब्रॅन्चने न्यायालयाच्या परवाणगीने ही नोटीस काढली आहे. यात २५ कोटी कर्ज थकल्याचे बोलले जात आहे.