नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. आज राम नवमीनिमित्त नाशिक नगरी गजबजुन निघाली असून पंचवटीत मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक ऐतिहासिक, पौराणिक नागरी म्हणून नाशिकची ओळख असून ही भूमी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. या आजच्या खास दिवसासाठी मागील ८ दिवसांपासून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच आजच्या या विशेष दिवसानिमित्त देखील अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शहरातील काळाराम मंदिरात सकाळपासून भक्तांची रीघ लागलीय, तसेच भाविक रामाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20