नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना सदनिकेसाठी दीड लक्ष रुपयांची मदत मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून देण्यात आली. आज राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे कर्डक कुटुंबीयांना धनादेश सुपूर्त करण्यात आला.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना शासनाच्या वतीने सदनिका देण्यात आली होती. मात्र ही सदनिका ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांकडे स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची घरासाठी परवड सुरूच होती. याबाबत आज वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व विश्वस्त समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक दायित्वातून तातडीने दीड लक्ष रुपयांची मदत कर्डक कुटुंबीयांना दिली.
आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे त्यांच्या हस्ते कर्डक कुटुंबीयांना दीड लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. या मदतीबद्दल कुटुंबीयांनी मेट भुजबळ नॉलेज सिटी व भुजबळ कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, आ माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, दिलीप खैरे, नाना महाले, डॉ अपूर्व हिरे, गजानन शेलार, कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
Lokshahir Wamandada Kardak Family Help for Home