नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नवे संसद भवन आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत तयार होणार असल्याने भाजपने आता लोकसभेतील खासदारांची संख्या वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत असलेली ५४५ ही खासदार संख्या थेट १ हजारावर नेण्याचे नियोजन सुरू आहे.
सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू पुनर्विकास परियोजनेच्या अंतर्गत लोकसभेतील जागा एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रस्ताव आहे, असा दावा काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेतील जागा वाढविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, पण ते लागू करण्यापूर्वी जनतेचे मत घेतले पाहिजे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
मनीष तिवारी यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या संसदेतील सहकाऱ्यांकडून याची माहिती मिळाली आहे. १००० जागा असलेले नवे संसद भवन उभारले जात आहे. मात्र ते तयार करण्यापूर्वी पहिले गंभीर चर्चा होऊन सार्वजनिक मत घेतले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभेतील जागा वाढविल्या तर राज्यांमधील विधानसभांचे महत्त्व उरणार नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.
तिवारी यांच्या ट्वीटवर काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे की, ‘हा मुद्दा सार्वजनिक पातळीवर चर्चेला यावा लागेल. भारतासारख्या मोठ्या देशात लोकांनी निवडून दिलेल्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची गरज आहे, मात्र ही वाढ लोकसंख्येच्या आधारावर होत असेल तर दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधीत्व आणखी कमी होईल आणि ते आम्हाला मान्य नसेल.’ त्यावर मनीष तिवारी यांनी अद्याप काहीही ठरलेले नाही, असे म्हटले आहे. प्रस्तावात महिलांसाठी एक तृतियांश आरक्षण आहे की नाही, हेदेखील माहिती नाही.
सेंट्रल व्हिस्टा पुरनिव्राक योजनेत एक नवीन संसद भवन, एक संयुक्त केंद्रीय सचिवालस, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे नवे निवासस्था आदींचा समावेश आहे. यात राष्ट्रपी भवन ते इंडिया गेट या तीन किलोमीटर लांब राजपथचाही पुनरुद्धार होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की या योजनेसाठी केवळ २२ झाडे तोडावी लागली आहेत.