लासलगांव – निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात वादपूर्व व न्यायप्रविष्ठ अशा एकुण 1680 प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली यातुन 6 कोटी 86 लाख 42 हजार 337 रुपयांची वसुली झाली आहे. लोकन्यायालयातून सकारात्मक परिणाम झाले आहेत. निफाड तालुका विधी व सेवा समितीचे अध्यक्ष तथा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनात एकुण सात समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज सुरु झाले निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश १- आर. जी. वाघमारे, निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ पी. डी. दिग्रसकर, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. जहागीरदार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाय. डी. बोरावके, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. बी. काळे, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. डब्ल्यू. उगले, निफाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एन. गोसावी या सात न्यायाधीशांचे अध्यक्षतेखाली पाच समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाजास सुरुवात झाली. या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ठ 846 प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात आली. त्यापैकी 131 प्रकरणात यशस्वी तडजोडी झाल्या. त्यातून 3 कोटी 74 लाख 70 हजार 46 रुपयांची वसुली झाली तर न्यायालयात दाखल न झालेल्या अशा वादपुर्व 7499 प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली होती त्यापैकी 1549 प्रकरणे तडजोडीत मिटली आहेत. त्या प्रकरणातून 3 कोटी 11 लाख 72 हजार 291 रुपयांची वसुली झाली. अशा प्रकारे निफाडचे लोकन्यायालयात न्यायप्रविष्ठ व वादपुर्व अशा नेमलेल्या एकुण 8345 प्रकरणांपैकी 1680 प्रकरणे तडजोडीने मिटली आहे. त्यातुन 6 कोटी 86 लाख 42 हजार 337 रुपयांची वसुली झाली आहे