नाशिक – वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी ई चलनाद्वारे केलेल्या कारवाईत ८ हजार २१२ वाहनचालकांनी शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सुमारे ६३ लाख ३८ हजार ९५० रूपयांचा तडजोडी दंड भरला. प्राधिकरणाने तीन हजार वाहनधारकांना नोटीसा बजावल्यात. या नोटीसीनुसार एक हजार ३३ वाहनधारकांनी चार लाख ६६ हजार ३०० रूपयांचा दंड भरला. दरम्यान, याच अनुषंगाने वाहतूक शाखेने २५ हजार ६४२ वाहनधारकांना एसएमएसद्वारे दंड भरण्याचे सुचित केले होते. यापैकी २४ सप्टेंबरपर्यंत सात हजार १७९ वाहनधारकांनी तब्बल ५८ लाख ७२ हजार ६५० रूपयांचा दंड भरला. लोकअदालत आणि एसएमएस याद्वारे २८ हजार ६४२ वाहनधारकांपैकी आठ हजार २१२ वाहनधारकांनी ६३ लाख ३८ हजार ९५० रूपयांचा दंड वसूल झाला. ही आजपर्यंतची विक्रमी वसुली ठरली आहे. वाहतूक शाखेने ऑनलाईन दंड करण्यास प्राधान्य दिल्यामुळे प्रत्यक्ष दंड वसुलीपेक्षा ऑनलाईन दंडाचे प्रमाण या दंड रक्कमेत जास्त होते.