सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

by Gautam Sancheti
जून 23, 2025 | 7:22 am
in मुख्य बातमी
0
om birla arrival 1024x576 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रविवारी रात्री ११ वाजता आगमन झाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून, २०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेस लोकसभा अध्यक्ष बिर्ला उपस्थित राहणार आहेत.

असे आहे कार्यक्रम
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज महाराष्ट्रातील मुंबई येथे संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधीमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. लोकसभा अध्यक्ष संसदेच्या अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिन स्मरणिकेचे प्रकाशन देखील करतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार; महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शंकर शिंदे; महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर; आणि भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन पंडितराव खोतकर उपस्थितांचे स्वागत करतील तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आभार प्रदर्शन करतील. भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधान मंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य; महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या सत्राला उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसांच्या या परिषदेदरम्यान, भारतीय संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य पुढील विषयावर विचारमंथन करतील:

‘प्रशासनात कार्यक्षमतेसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मंगळवार, २४ जून रोजी, समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला; राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; भारतीय संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल; आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

Next Post

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

ताज्या बातम्या

Untitled 55

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

जुलै 28, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये अडीच लाखाचा ऐवज चोरीला

जुलै 28, 2025
Untitled 54

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दोन दहशवादी ठार

जुलै 28, 2025
rohini khadse e1712517931481

रोहिणी खडसे यांची पतीच्या अटकेवर २४ तासानंतर पहिली प्रतिक्रिया….

जुलै 28, 2025
Gw3d92jXUAErPq5

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड

जुलै 28, 2025
cbi

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची मोठी कारवाई ; तिघांना अटक

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011