शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोगो तयार करा आणि मिळवा थेट १ लाख रुपयांचे बक्षिस

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 22, 2021 | 4:43 pm
in राष्ट्रीय
0
logo

मुंबई – राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, आकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी isumharashtra@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. या स्पर्धेची अधिक माहिती https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

ऑगस्ट 2021 महिन्यात बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. योग्य प्रवेशिका प्राप्त न झाल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह (LOGO) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात.

अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करून उत्तम क्रीडा मार्गदर्शक तयार करणे, क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञान यामाध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’’ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या सहभागाच्या दृष्टीने नियम व अटी साठी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत..

निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह LOGO) सादर करणा-या प्रवेशिकेस रु. १,००,०००/- (रुपये एक लक्ष मात्र) इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. बोधचिन्ह (LOGO) स्व‍िकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील. बोधचिन्ह (LOGO) पाठवताना कोरल ड्रॉ, Psf, JPEG स्वरुपात पाठवावे, बोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नांव, क्रमांक किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल. बोधचिन्ह (LOGO) तयार करताना ते मूळ स्वरूपात व स्वतः तयार केलेला असावा.

स्पर्धकाने बोधचिन्ह (LOGO) डिझाईन पाठवताना त्याचे नांव, निवासाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व आपला ई-मेल पाठविण्यात आलेल्या ई मेलमध्ये नमूद करावा. बोधचिन्ह (LOGO) पाठवतांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com या ई मेल वर पाठवावा, अन्य ई-मेलवर पाठविण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी क्र.९७३०२००६५६ श्री.उदय पवार, तालुका क्रीडा अधिकारी, पुणे, यांना संपर्क करावा.

या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीज, डिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणा-या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा बोधचिन्ह (LOGO) क्रीएटीव्ह असावा, सेल्फ मेड असावा, त्यात रचनात्मकता असावी. तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मूळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभागी होता येईल. लोगो ( बोधचिन्ह ) A/ 4 साईझ कागदावर असावे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिशन (Mission) संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठणे. क्रीडा विद्यापीठ दृष्टीकोन (Vision) : खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे. क्रीडा विद्यापीठ ध्येय (Motto): क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे.

क्रीडा विद्यापीठ उद्दीष्टे (Objectives) :
भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे.
क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे.
प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे.
क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे.
क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.
आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे,
समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे.
खेळाडू क्रीडा तज्ञ, कीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाचखोरीची तक्रार करायचीय? त्वरित या नंबरवर व्हॉटसअॅप मेसेज करा

Next Post

दिवाळीपूर्वीच फळपीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
dadaji bhuse 750x375 1

दिवाळीपूर्वीच फळपीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
crime 1111

वाहन चोरीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी चोरीला

ऑगस्ट 2, 2025
unnamed 5

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एअरोनॉमिक्स २०२५ मोहिमेचा शुभारंभ….स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011