गुरूवार, मे 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ५ हजार १२७ कोटींच्या सामंजस्य करारामुळे सिन्नरसह या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित होणार

by India Darpan
मे 15, 2025 | 6:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स (Logistics Park) क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक (Investment) आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या सामंजस्य करारावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. राज्य सरकार तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नरसह पनवेल, भिवंडी, नागपूर, चाकण यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत.

आज झालेला सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे. या करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी १ कोटी ८५ लाख चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल.

ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक तसेच लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर.के.नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन ॲडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन ॲडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल आदी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कामांमध्ये सावध भूमिका घ्यावी, जाणून घ्या, गुरुवार, १५ मेचे राशिभविष्य

Next Post

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ १५ व १६ मे रोजी बंद…हे आहे कारण

Next Post
NEW LOGO 11 1

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ १५ व १६ मे रोजी बंद…हे आहे कारण

ताज्या बातम्या

crime1

कच्चा माल खरेदी विक्री व्यवहारात व्यावसायीकास साडेतीन लाखाला गंडा

मे 15, 2025
rain1

या चौदा जिल्ह्यात मान्सून-पूर्व पावसाचा जोर अधिक…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 15, 2025
fir111

ट्रस्टच्या जागेत बेकायदा बांधकाम करुन विक्री….दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

मे 15, 2025
jail11

सिडकोत मॅफेड्रोन विक्री करणा-या दोघा प्लेडरांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

मे 15, 2025
gov e1709314682226

इयत्ता १२ वीच्या गुणपत्रिकांचे वाटप १६ मे पासून…..

मे 15, 2025
crime 71

विल्होळी शिवारातील हत्या प्रकरणाचा उलगडला… अनैतिक संबधातून झाल्याचा संशय, एक जण गजाआड

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011