मुंबई – राज्यात लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेने परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या ठिकाणी शेकडो मजुरांनी धाव घेतल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये मोठा जमाव एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूरांचा धीर सुटला आहे. त्यामुळेच ते गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जमत आहेत. दरम्यान, कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1381850376631058433