नवी दिल्ली – दिवसाकाठी तब्बल २५ हजाराहून अधिक नवे कोरोना बाधित होत असल्याने अखेर दिल्लीतील लॉकडाऊन आणखी आठवड्याभरासाठी वाढविण्यात आला आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत यापूर्वीच लॉकडाऊन लागू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज विशेष बैठक घेण्यात आली. त्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारपर्यंत (३ मे) हा लॉकडाऊन असणार आहे.
दिल्लीत २६ एप्रिल पर्यंत सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. वाढते बाधित पाहता आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. म्हणून हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. या आगामी ६ दिवसात दिल्लीत भक्कम अशा आरोग्य सुविधा आम्ही निर्माण करणार आहोत. ज्या लॉकडाऊनंतर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील, असेही केजरीवाल म्हणाले. मात्र, दिल्लीतील बधितांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. ती दिवसेंदिवस वाढतच आहे.
https://twitter.com/ANI/status/1386207133658619907