लंडन (इंग्लंड) – धुम्रपान करणार्यांना कर्करोगाचा धोका असतोच, ही गोष्ट तर सर्वांना माहित आहे. परंतु त्यांच्याबरोबर राहणाऱ्यांनाही तोंडाच्या कर्करोगाचा धोका होण्याची जास्त शक्यता आहे, असे ब्रिटनमधील नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार आढळून आले आहे.
किंग्ज कॉलेज, लंडन यांनी केलेल्या नव्या अभ्यासात म्हटले आहे की, केवळ धूम्रपान करणारेच नाही तर धूम्रपान न करणार्या परंतु धुम्रपान करणार्यांसोबत राहिल्यास तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका 51 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. धुम्रपान केल्याने फुफ्फुसे, पोट, तोंड, घसा आणि ओठांचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
यापुर्वीच काही तज्ज्ञांनी म्हटले की, दीर्घ काळापासून धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती सोबत दुसर्या धूम्रपान न केलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका देखील लक्षणीय वाढतो. सिगारेट, पाईप आणि सिगारच्या धुराचे लोटमुळे होणारा आरोग्याचे धोका हा आरोग्यासाठी एक चिंतेचा विषय आहे.
तंबाखूचा धूर जगभरातील कर्करोगाने होणाऱ्या पाच पैकी एका व्यक्ती धुम्रपानाशी जोडला गेला आहे. प्रत्येक तीन प्रौढांपैकी एक आणि ४० टक्के मुले धुम्रपान करणार्या व्यक्तीच्या आसपास असल्याने ‘अनैच्छिक धुम्रपान’ ग्रस्त आहेत.
जगभरातील सुमारे ७ हजार लोकांच्या सर्वेक्षण आकडेवारीच्या आधारे हे उघड झाले आहे की, सेकंड-हँड धुम्रपान करणार्यांना (धुम्रपानालगत फक्त उभ्या असलेल्या ) तोंडाच्या कर्करोगाचा धोका ५१ टक्के जास्त असतो. त्यात असेही आढळले की, वारंवार संपर्क येण्यामुळे एखाद्याचा धोका वाढतो. या अभ्यासात असे म्हटले आहे की धूम्रपान करणाऱ्यांच्या घरात सुमारे दहा ते पंधरा वर्षे राहतात, अशा लोकांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.