नाशिक – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन श्रावणातील प्रत्येक सोमवारी घेण्यासाठी भाविक आसुसलेले असतात. त्यामुळेच त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे शिवभक्तांवर काहीसे विरजण पडले आहे. याची दखल श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतली आहे. भाविकांना घबरसल्या त्र्यंबकराजाचे दर्शन घेता यावे यासाठी यु ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जात आहे.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग लाईव्ह दर्शनासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा