नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय जल आयोग साप्ताहिक आधारावर देशातील १४६ धरणांच्या जिवंत पाणी साठवण स्थितीचे निरीक्षण करते. यापैकी १८ धरणे जलविद्युत प्रकल्पातील आहेत या धरणांची एकूण प्रत्यक्ष साठवण क्षमता ३४.९६० अब्ज घनमीटर आहे. १४६ धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता १७८.१८५ अब्ज घनमीटर आहे. १३ जुलै रोजी जारी केलेल्या धरण जलसाठवण संदर्भातील विवरणानुसार ,या धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा ५९.५०३ अब्ज घनमीटर असून एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या ३३ टक्के आहे.
तथापि, मागील वर्षी याच कालावधीमध्ये या धरणांमध्ये उपलब्ध जिवंत जलसाठा ६९.७२६ अब्ज घनमीटर होता आणि गेल्या १० वर्षांची या जलसाठ्याची सरासरी ५३.९०४ अब्ज घनमीटर होती.अशाप्रकारे, १३ जुलैच्या विवरणानुसार, १४६ धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत साठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील जिवंत साठ्याच्या ८५ टक्के आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या ११० टक्के इतका आहे.
एकूण साठवण स्थिती संपूर्ण देशात गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा कमी आहे मात्र मागील दहा वर्षांच्या याच कालावधीतील सरासरी साठ्यापेक्षा ती चांगली आहे. देशात उपलब्ध असलेल्या जिवंत पाणीसाठ्याची स्थिती १४६ धरणांच्या उपलब्ध डेटाच्या आधारे १३ जुलैच्या जलाशय साठ्याच्या विवरणानुसार, देशात निर्माण होणाऱ्या अनुमानित एकूण जिवंत पाणीसाठा २५७.८१२ अब्ज घनमीटरच्या तुलनेत देशात अनुमानित जिवंत पाणीसाठा ८३.८१६ अब्ज घनमीटर आहे .
संबंधित कालावधीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत (% मध्ये) चांगला पाणीसाठा असलेली राज्ये:
हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, ओदीशा , उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
संबंधित कालावधीसाठी मागील वर्षीप्रमाणेच समान जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये:
गुजरात.
संबंधित कालावधीसाठी गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये:
पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा (दोन्ही राज्यांमधील दोन एकत्रित प्रकल्प), आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू.