इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारच्या मातीतून होणाऱ्या मतचोरीच्या विरोधात थेट लढा देण्यासाठी राहुल गांधी यांची आज व्होटर अधिकार यात्रा सुरु झाली. बिहारच्या मातीतून होणाऱ्या मतचोरीच्या विरोधात थेट लढा देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेतेही सामील झाले. ही यात्रा १६ दिवसांची असून १३०० किमी अंतर ती कापणार आहे. यात बिहारमधील बहुतांश जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे.
काँग्रेसने सांगितले की, हा केवळ निवडणुकीचा मुद्दा नाही – लोकशाही, संविधान आणि ‘एक माणूस, एक मत’ या तत्त्वाचे रक्षण करण्यासाठी हा एक निर्णायक लढा आहे. आम्ही देशभर स्वच्छ मतदार यादी सुनिश्चित करू. तरुण, कामगार, शेतकरी – प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी होत आहे.
यावेळी मत चोरांचा पराभव – जनतेचा विजय, संविधानाचा विजय असे सुत्र सांगण्यात आले.
तर बघा, लाईव्ह…..