पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आहेत.
लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी १ ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. पंतप्रधान या पुरस्काराचे ४१ वे मानकरी असतील. या पूर्वी या मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन या मान्यवरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. तसेच, खासकरुन शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वात ३०हून अधिक आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार आणि मोदी हे एकाच व्यासपीठावर आले आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. तसेच, पवार यांनी या सोहळ्याला जाऊ नये, असे म्हटले आहे. त्यामुळेही या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बघा, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
Live PM Narendra Modi Pune Lokmanya Tilak Award
Sharad Pawar Prime Minister