नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आचानकपणे देशवासियांशी थोड्याच वेळात पूर्वी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचा संसर्ग, देशातील लसीकरणाची सद्यस्थिती, अन्य देशांमधील स्थिती आदींबाबत देशवासियांना माहिती दिली. देशात १४१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आपण जराही गाफील रहायला नको, योग्य ती खबरदारी आणि कोरोना निर्बंधांचे पालन आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी यावेळी काही मोठ्या घोषणा केल्या. त्या अशा
– देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी येत्या ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाणार
– आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम बूस्टर डोस दिला जाणार
– आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बूस्टर डोसला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार
– देशातील ६० वर्षे वयावरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
पंतप्रधानांचे पूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/narendramodi/status/1474775804336697345?s=20