मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ, शेतक-यांचे प्रश्न, दऱड कोसळण्याची घटना, निधी वाटप या विषयांवर चर्चा झाली. त्यात काही विषयांवर सत्ताधा-यांना विरोधकांना घेरले. त्यानंतर आता कोणत्या विषयावर विरोधक सत्ताधा-यांना घेरतात हे पुढील काळात समोर येणार आहे.
त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याची निवड अजून रखडली आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झालेल्या १० प्रस्तावित विधेयकांसह १४ विधेयकांवर चर्चा करण्यात येत आहे. तसेच ६ अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले आहेत. अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे.