नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत करत थेट पुरावे सादर केले. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? असे सांगत त्यांनी त्याबाबतचे पुरावे दिले. डुप्लिकेट मतदार बनावट आणि अवैध पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार, अवैध फोटो, फॉर्म ६ चा गैरवापर याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थितीत केले. त्यानंतर आता निवडणूक आयोग रविवारी १७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते मतचोरीच्या आरोपांवर उत्तरे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांबाबत मोठी घोषणाही या पत्रकार परिषदेत केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
बघा, ही पत्रकार परिषद लाईव्ह….