मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. मुख्य़मंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादा भुसे मनमाडमध्ये दाखल झाले आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. सध्या ११ किमी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नांदगाव मतदारसंघातील अन्य कामांचे उद्घाटन व काही कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात येत आहे.
या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले आहे. बघा त्याचे थेट प्रक्षेपण
Live Cm Eknath Shinde Manmad MLA Suhas Kande Water project