नवी दिल्ली – राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांसह विरोधकांच्या अनेक प्रश्नांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे असे
- शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे, आपण चर्चेतून प्रश्न सोडवू
- या सभागृहाच्या माध्यातून मी शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण देत आहे
- कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद सुरू आहे
- आंदोलन करणे हा आपला हक्का आहे, पण मी विनंती करतो की आंदोलनात वृद्धही आहेत. त्यांना घरी घेऊन जा. आंदोलन संपवा. आपण एकत्र चर्चा करु आणि पुढे जाऊ
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितल्यानुसारच, कृषी सुधारणा करण्यात आल्या आहेत
- प्रत्येक सरकार कृषी सुधारणांसाठी पुढाकार घेत आहे. तसा आम्हीही घेतला आहे
- विरोधकांनी कृषी सुधारणांबाबत घेतलेला यु टर्न योग्य नाबी
- आंदोलकांना समजावून सांगणे आणि देशाला पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे
- आंदोलनाविषयी सगळे बोलतात पण आंदोलन का सुरू आहे, हे कुणीही सांगत नाही
- शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मुद्द्यांबाबत चर्चा झाली पाहिजे
- देशातील ८६ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. अशा अल्पबूधारक शेतकऱ्यांविषयी आपण काहीच बोलत नाही. त्यांची उन्नती करणे ही आपली सर्वांची जबाबदारी नाही का
- एमएसपी राहणारच, त्यात कुठलाही बदल केला जाणार नाही
- मोदी आहे, टीका करा, चर्चा करत रहा, आनंद घ्या
बघा मोदींचे पूर्ण भाषण
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/lepprXZ8Ak
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2021