नवी दिल्ली – लडाखच्या सीमेवर चीनकडून सतत होणार्या अतिक्रमणांच्या प्रयत्नांवर आणि त्यामुळे भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (११ फेब्रुवारी) राज्यसभेत निवेदन केलं.
वादग्रस्त जागेबाबत दोन्ही देशांदरम्यान करार झाला आहे. पँगोंग लेक येथून दोन्ही बाजूचे जवान मागे जात असून, सीमेवर दोन्ही देश जैसे थे स्थिती ठेवणार आहेत, असं राजनाथ सिंह यानी म्हटलं आहे. चीनकडून अनेक वेळा अतिक्रमण करण्याचे प्रयत्न झाले. परंतु भारताच्या जवानांनी ते हाणून पाडले. त्यामुळे भारत-चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. भारताची पूर्ण तयारी असून लडाखमध्ये भारतानं चीनवर आघाडी घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. सप्टेंबरपासून दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून, चर्चेद्वारेच यावर तोडगा निघू शकतो.
भारतानं काहीच गमावलं नाही, असं स्पष्ट करत त्यांनी थंडीत आणि बर्फवृष्टीत आपले जवान ठामपणे उभे आहेत, अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सर्वजण ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/rajnathsingh/status/1359729421003878403