मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
असे म्हणतात की, ‘जेथे चोरांचा धाक त्याच गावात दिवस मावळतो!’ म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा प्रवासी पर्यटक किंवा धार्मिक तीर्थक्षेत्राची यात्रा करणारे भाविक, पर्यटक किंवा यात्रेकरू हे पायी किंवा घोडे, बैलगाडी उंट वगैरे वाहनांवरून प्रवास करत असत, तेव्हा रात्रीच्या वेळी मुक्कामाला एखाद्या गावी थांबत. परंतु ते गाव सुरक्षित आहे की नाही हे त्यांना माहीत नसे, त्यामुळे काही वेळा मुक्कामाच्या ठिकाणी या फिरस्त्या प्रवासी पर्यटक किंवा भाविकांची जीविताला धोका निर्माण होत असे, तसेच त्यांच्या जवळील व्यवस्था मौल्यन वस्तू यांची चोरी होत असे. आजच्या काळात कदाचित असे घडणार नाही असे आपल्याला वाटू शकते, परंतु जगामध्ये आजही अनेक असुरक्षित शहर आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित शहर देखील आहेत त्यांची यादीच आपण जाणून घेऊ या
जगात राहण्यासाठी सर्वात नालायक शहरांमध्ये पाकिस्तानच्या कराचीचा समावेश झाला आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिटने जगातील राहण्यासाठी लायक आणि नालायक अशा १०-१० शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यासाठी १७२ शहरांचा अभ्यास करण्यात आला. नालायक शहरांच्या यादीत पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीचा समावेश झाला आहे. पाकिस्तानातील कराची पुन्हा एकदा जगातील टॉप 10 सर्वात वाईट ठिकाणांपैकी एक बनले आहे. कराचीला यंदा सातवे स्थान मिळाले आहे. अभ्यासामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. परकीय चलनाचा घटता साठा आणि वाढत्या महागाईमुळे पाकिस्तान आर्थिक मंदीच्या मार्गावर आहे.
UNDP च्या मते, पाकिस्तानवर 250 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेले कराची शहर देखील गंभीर अस्थिरतेच्या काळातून जात आहे. हे संकट लाखो लोकांना दारिद्र्याकडे आणि उपासमारीच्या दिशेने नेत आहे. त्याबरोबरच सामाजिक अशांतता वाढण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानमधील चलनवाढीचा दर जुलैमध्ये दुहेरी अंकात पोहोचला, ही जवळपास सहा वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. याशिवाय, देशातील गरीब राहणीमान, चोरी, तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसाचार यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली आहे. जगातील राहण्या योग्य शहरे युरोप आणि कॅनडामध्ये आहेत. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना जगातील राहण्यासाठी टॉप 10 ठिकाणांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 2018 आणि 2019 मध्येही व्हिएन्ना अव्वल ठरले होते.
राहण्या योग्य बेस्ट १० शहरे अशी
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
कोपनहेगन, डेन्मार्क
झुरिच, स्वित्झर्लंड
कॅलगरी, कॅनडा
व्हँकुव्हर, कॅनडा
जिनिव्हा, स्वित्झर्लंड
फ्रँकफर्ट, जर्मनी
टोरोंटो, कॅनडा
अॅम्सटरडॅम, नेदरलँड
ओसाका, जपान आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया (टाय)
ही आहेत जगातील पहिली दहा ‘नालायक’ शहरे
तेहरान, इराण
डौआला, कॅमेरून
हरारे, झिम्बाब्वे
ढाका, बांगलादेश
पोर्ट मोरेस्बी, पीएनजी
कराची, पाकिस्तान
अल्जियर्स, अल्जेरिया
त्रिपोली, लिबिया
लागोस, नायजेरिया
दमास्कस, सीरिया
Livable and Non Livable City Index Declare
Global Annual Survey
Tehran Iran Vienna Austria Top City