नवी दिल्ली – भाऊ आणि बहिणीचे नाते अतिशय प्रेमाचे असते. याच प्रेमाला वृद्धींगत करणारी एक घटना समोर आली आहे. लहान भावाने किडनी देऊन बहिणीला जीवनदान दिल्याची घटना घडली आहे. आजच्या कलियुगात शक्यतो जवळचेही परके बनतात. पण, या उदाहरणावरुन भावाबहिणेचे नाते किती दृढ आहे हे स्पष्ट होते.
हरियाणा राज्यात रोहतकमध्ये राहणाऱ्या रिया (वय ३१) ही माहिला गेल्या पाच वर्षांपासून डायलिसिस करत होती. कारण अलीकडेच त्याची किडनी निकामी झाली होती. अशा परिस्थितीत तातडीने अवयव प्रत्यारोपणाची गरज होती, पण अवयव दाता न मिळाल्याने या रुग्णाची समस्या वाढली होती. अशा परिस्थितीत तिच्या भावाने आपले कर्तव्य पार पाडताना किडनी दान केली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रियाला केवळ नवीन जीवन मिळाले नाही तर आता ती पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकते. गेल्या महिन्यात तिला दिल्लीच्या आकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे आठवड्यातून तीनदा डायलिसिस करण्यात आले आणि नंतर त्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले.
रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विक्रम कालरा यांनी सांगितले की, वास्तविक रियाच्या पतीला किडनी दान करायची होती, परंतु त्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नव्हता. यानंतर तिच्या भावाची तपासणी करण्यात आल्यावर हा रक्तगट जुळला आणि प्रत्यारोपण पाच तासांच्या शस्त्रक्रियेत पूर्ण झाले. खरे म्हणजे ही एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. कारण रुग्णाचे हृदय त्याच्या क्षमतेच्या केवळ २५ टक्केच पंप करत होते. यामुळे फुफ्फुसात जास्त द्रव जमा होण्याचा धोका निर्माण झाला, तरीही प्रत्यारोपण यशस्वी झाले. कारण रुग्णाच्या शरीराने प्रत्यारोपित अवयव चांगल्या प्रकारे स्वीकारला आणि प्रत्यारोपणानंतर त्याच्या हृदयाचे कार्य सुधारले.
डॉ. विकास अग्रवाल म्हणाले की, या प्रकरणात रुग्णाच्या दीर्घकालीन उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे तिच्या किडनीवर परिणाम झाला होता. तसेच इतर लोकांनी देखील लक्षात ठेवायला पाहिजे की, अनेकच्या ज्या सामान्य सवयी आहेत, त्यामुळे किडनीच्या कार्याला हानी पोहोचवू शकते. यात वेदनाशामक औषधांचा अति वापर, नियमितपणे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, पुरेशी झोप न घेणे, पुरेसे पाणी न पिणे, जास्त मांसाहार करणे, गोड किंवा साखर खाणे आणि अनियमित जीवनशैली यांचा वाईट परिणाम होत आहे. तसेच या गोष्टींमुळे शहरी भागात किडनीचे आजार वाढत आहेत.