नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय लायन्स क्लबच्या अधिवेशनात महाराष्ट्र (मुंबई वगळून) मल्टिपल कौन्सिलच्या खजिनदारपदी लायन राजेश कोठावदे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय संचालक जितेंद्रसिंग चव्हाण, मल्टिपल काँसिल चेअरमन दिलीप मोदी, माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ नवल मालू, राज मुछाल, गिरीष मालपाणी, जितेंद्र मेहता, बि एल जोशी हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात नूतन अध्यक्षपदी श्रवणकुमार, उपाध्यक्षपदी ला राजशेखर कापसे व सेक्रेटरीपदी पुरुशोत्तम जयपुरिया, यांची सुद्धा बिनिरोध निवड झाली.
लायन राजेश कोठावदे हे लायन्स क्लब ऑफ इटरनॅशनल च्या माध्यमातून गेल्या 1997-98 सालापासून आजपर्यंत सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांनी क्लब अध्यक्ष पदापासून ते डिस्ट्रिक्ट चे प्रांतपालपदापर्यंत डिस्ट्रिक्ट च्या विविध पदांवर उत्कृष्टरित्या कार्य केले असून वेळोवेळी त्यांना त्याकरिता विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत. ते 22-23 यावर्षासाठी डिस्ट्रिक्ट 3234D2 या प्रांताचे प्रांतपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्रांतपाल पदाच्या काळात त्यांनी आपल्या प्रांताला सामाजिक कार्यात एका ऐतिहासिक उंचीवर नेले. डायबेटिस अवरनेस कार्यात त्यांच्या नेतृत्वात प्रांताचा इंटरनॅशनल लेव्हल ला प्रथम क्रमांक आला. त्याचप्रमाणे कन्यादान, सायकल बँक व रोबोटिक लॅब यातही प्रांताने त्यांच्या नेत्रुत्वात उल्लेखनीय कार्य केले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात सिन्नर तालुक्यात झालेल्या अतृिष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय संघटनेकडून दहा हजार डॉलरची मदत आणली व त्या गरीब बांधवचे संसार उघड्यावर पडले अशा परिवाराला स्टीलची भांडी, रोजचा किराणा व चादर याचे किट बनवून वाटप करण्यात आले. नाशिक ,नगर व पुणे येथील विविध लायन्स क्लब या प्रांतात येतात व लायन राजेश कोठावदे यांचे भरीव नेतृत्वगुण व मार्गदर्शन यामुळे प्रांतातील सर्व क्लब उत्कृषटरित्या सामाजिक कामे करून जनतेची सेवा करीत आहेत. अश्या या निस्वार्थ भावनेने सेवा कार्य करत असलेल्या लायन राजेश कोठावदे यांची लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टिपल डिस्ट्रिक्ट कौन्सिल च्या राज्यस्तरीय खजिनदारपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे समाज्याच्या सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
Lions International Rajesh Kothawade