नाशिक – लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सची ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण संचालक मंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर रॉयल्स क्लब तर्फे विविध सेवाकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच सन २०२१-२०२२ च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ती अशी
अध्यक्ष – सतिश अलई
सचिव – भूषण महाजन
खजिनदार – उमेश वाघ
उपाध्यक्ष – सचित लोणारी
या सर्वांची निवड एकमताने करण्यात आली. या बैठकीला रॉयल्सचे संस्थापक अध्यक्ष मनिश अहिरे, उपप्रांतपाल २ राजेश कोठावदे, अध्यक्ष राहुल वेढणे, प्रशांत कोतकर, समाधान सोनवणे, हरिष कुंभारे, प्रसाद गवळी, समिर दुसाने, मिलिंद कुलकर्णी, सरंग सोंजे आदी उपस्थित होते. स्वागत समिर दुसाने यांनी तर आभार प्रदर्शन हे भूषण महाजन यांनी केले.