नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील लायन्स क्लब ऑफ नासिक रॉयल्स या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा नुकताच नासिक येथील कोर्टयार्ड मॅरियट येथे मोठ्या उत्साहात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नूतन पदाधिकारी शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्यासाठी खास नागपूर येथुन लायन्स क्लबचे मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन श्रवण कुमार तसेच माजी प्रांतपाल राजेश कोठावदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वप्रथम ध्वजवंदना घेण्यात आली. यावेळेस प्रथमच संस्कृत भाषेत सौ.मृणाल महाजन यांच्यातर्फे ध्वजवंदना सादर करण्यात आली. सर्वानी या नवीन प्रकारे सादर करण्यात आलेल्या ध्वजवंदनेबद्दल संस्थेचे कौतुक केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या सुमधुर आवाजात सौ.पूनम कोतकर यांनी स्वागतगीत सादर केले. पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. माजी अध्यक्ष समाधान सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या अहवालाचे वाचन करताना त्यांच्या कार्यकाळातील सर्व पदाधिकारी आणि संचालकांचे आभार मानले. तसेच लिओ क्लबचे माजी अध्यक्ष विशाल कोठावदे यांनी देखील त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या अहवालाचे वाचन केले.
पदग्रहण सोहळ्यास सुरुवात करण्यापूर्वी अदिती महाजन यांनी अतिशय उत्तमरित्या प्रमुख अतिथी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन श्रवण कुमार यांचा परिचय करून दिला. श्रवण कुमार यांनी सर्व नूतन कार्यकारिणीस त्यांचे पद व त्याची जबाबदारी समजवून सांगताना अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडणी केली. त्यांनी प्रत्येक पदाधिकारी साठी चित्रपटातील काही गीते निवडली होती. त्यातुन त्यांची भूमिका स्पष्ट होत होती. त्यांची ही पद्धत उपस्थितांना खूप भावली. नूतन पदाधिकारी म्हणून अध्यक्षपदी भूषण महाजन तर सचिवपदी सचिन बागड खजिनदारपदी योगिता अमृतकर तसेच सहसचिव म्हणून प्रशांत कोतकर , सहखजिनदार पदी संदीप मोरे , चार्टर्ड प्रेसिडेंट म्हणून मनीष अहिरे , सल्लागार म्हणून प्रवीण जयकृष्णीया , राहुल वेढणे , सतीश अलई यांची नेमणूक करण्यात आली. तसेच इतर पदाधिकारी मध्ये प्रथम उपाध्यक्ष म्हणून विवेक वाणी तर व्दितीय उपाध्यक्ष म्हणून नितीन जंगले , जीएमटी चेअरपर्सन हरीश कुंभारे , जीएलटी चेअरपर्सन सागर कोठावदे , जीएसटी चेअरपर्सन उमेश वाघ , पीआरओ विशाल कोठावदे, टेल ट्वीस्टर अजय वाणी , टेमर म्हणून सचिन बोडके तर संचालकपदी जितूभाई पटेल, डॉ.तुषार देवरे, जगदीश कोठावदे , निलेश मकर , कुणाल मुसळे , शुभम अमृतकर , ज्ञानदेव बोंडे आदींची नेमणूक करण्यात आली. तसेच लिओ क्लब च्या अध्यक्षपदी सौरभ शिरोडे, सचिवपदी मयूर शिरोडे तर खजिनदार पदी शुभम कोठावदे यांची नेमणूक करण्यात आली. याप्रसंगी विनोदजी कपूर, राजजी मूछाल, गिरीशजी मालपाणी,मिलिंद जी पोफळे हे सर्व माजी प्रांतपाल उपस्थित होते व त्यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. तसेच जयेश ठक्कर, अभय तातेड, सुनील गवादे, शांतनू देशपांडे, मयूर कपाटे हे सर्व नरेडको या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष भूषण महाजन यांनी उपस्थित लायन्स सभासदांना संबोधित करताना अतिशय सुसुत्रितरित्या आपण वर्षभरात काय काय उपक्रम कशा नियोजनबध्द पद्धतीने राबवणार आहोत आणि त्यासाठी कोणी कोणी काय काय जबाबदारी स्वीकारायची आहे याचे सविस्तर विश्लेषण केले . तसेच त्यांनी जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवून एक उत्तम आर्थिक निधी संकलन करण्याचे आवाहन आपण स्वीकारले असल्याचे जाहिर केले. यासाठी त्यांना माजी प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी या कार्यसाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सदैव उपलब्ध राहील याची ग्वाही दिली. भूषण महाजन यांचा विस्तृत परिचय सौ.प्रतिभा वाणी यांनी करून दिला. त्यानंतर लिओ क्लब चे नूतन अध्यक्ष सौरभ शिरोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . माजी प्रांतपाल म्ह्णून उत्तम नेतृत्व सिद्ध करणारे राजेश कोठावदे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
माजी अध्यक्ष समाधान सोनवणे यांनी आपला पदभार भूषण महाजन यांना सोपवल्यानंतर त्यांचा उत्तम अध्यक्षीय कारकीर्द पार पाडल्याबद्दल सन्मान करण्यात आला . तसेच लिओ क्लब चे माजी अध्यक्ष विशाल कोठावदे यांना देखील सन्मानित करण्यात आले. त्यांनंतर माजी प्रांतपाल राजेश कोठावदे यांनी आपल्या बहारदार शैलीत नूतन कार्यकारिणीस आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन श्रवण कुमार यांनीही लायन्स चे विविध पैलू उलगडताना यात कसे कार्य केले पाहिजे याचे बहुमोल मार्गदर्शन केले.
विविधी उपक्रमासाठी नेमण्यात आलेल्या समिती प्रमुखांनी ते काय काय उपक्रम राबवणार आहेत , त्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. नूतन सचिव सचिन बागड यांनी पुढील कार्यप्रणाली विषयी माहिती दिली तर खजिनदार योगिता अमृतकर यांनी आभार प्रर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ,स्नेहल कोठावदे आणि विशाल कोठावदे यांनी केले. राष्ट्रीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन श्रवण कुमार यांचा विवाहदिन वाढदिवस देखील या व्यासपीठावर साजरा करण्यात आला.
याच दिवशी लायन्स क्लब तर्फे सर्व्हिस व्हॅन चे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या क्लबतर्फे नुकतेच अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने डॉक्टर , सी,.ए. , शेतकरी यांचा सन्मान सोहळा , वृक्षारोपण , वयोवृद्ध रुग्णांना अधिकमास निमित्त गरजेच्या वस्तूंचे वाटप, वृद्धाश्रमात किराणा मालाचे वाटप सौ.उषा व श्री.कांतीलाल वाणी यांच्या हस्ते सर्व लायन्स सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Lions Club of Nasik Royals New Body Declared