नाशिक – अग्रगण्य अशा लायन्स क्लब ऑफ नाशिक कार्पोरेटच्या अध्यक्षपदी विनय बिरारी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सेक्रेटरी पदी अॅड.नंदकिशोर लाहोटी व खजिनदार पदी उदय कोठावदे यांची एकमताने निवड झाली आहे.
संचालक मंडळाची बैठक चार्टर्ड प्रेसिडेंट चंद्रशेखर सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीस विद्यमान अध्यक्ष रमेश पवार, सेक्रेटरी श्रीकांत पाटील, माजी अध्यक्ष राजू व्यास, सागर बोंडे, राजेंद्र वानखेडे, बापुजी निकुंभ, एम.जे.एफ.विलासराव पाटील, अॅड.लक्ष्मणराव लांडगे, अॅड. डी.एस.पिंगळे, के.डी.पाटील व सतिश माळुंदे उपस्थित होते.
चार्टर्ड प्रेसिडेंट चंद्रशेखर सोनवणे यांनी सन २०२१-२०२२ या वर्षाकरीता क्लबचे अध्यक्ष म्हणून विनय बिरारी, सेक्रेटरी पदी अॅड.नंदकिशोर लाहोटी व खजिनदार पदी उदय कोठावदे यांची नावे सूचविली. त्यास एम. जे. एफ. विलासराव पाटील, बापू निकुंभ, सागर बोंडे व राजू व्यास यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व संचालकांच्या एकमताने वरीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे क्लबच्या सर्व सदस्यांकडून तसेच त्यांचेवर प्रेम करणारे मित्र, नातेवाईक व समाज बंधू भगिनीनी अभिनंदन करून त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून समाज सेवेचे उत्तम कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या.