मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विजय देवरकोंडाचा लायगर जोरदार आपटला; अनेक शो रद्द

by Gautam Sancheti
सप्टेंबर 3, 2022 | 6:43 pm
in मनोरंजन
0
Fa97Y3fUIAM6zAg

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमध्ये सध्या दर्जेदार चित्रपट निर्मिती होत नाही अशी आवई उठवली जात असताना प्रेक्षकांना आपल्याकडे वळवून घेण्यात दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी झाल्याचे चित्र आहे. आजही अनेक साऊथ चित्रपटांचे हिंदीत डब चित्रपट आणले आहेत आणि ते प्रेक्षकांकडून उत्सुकतेने पाहिले जातात. मात्र, विजय देवरकोंडा याचा बहुचर्चित ‘लायगर’ हा चित्रपट याला अपवाद ठरला आहे. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला, मात्र प्रेक्षक आपल्याकडे वळवण्यात चित्रपटाला अपयश आल्याचे चित्र आहे. ५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तमिळमध्ये सुद्धा हा चित्रपट आपटला आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या ‘लायगर’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३३ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टारची मुख्य भूमिका असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कामगिरी करू शकला नाही. एकीकडे साऊथचे चित्रपट हिट होत असताना दुसरीकडे बॉलिवूडमध्ये एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. याविषयी ‘लायगर’ची निर्माती चार्मी कौर हिने चिंता व्यक्त केली आहे. ‘लायगर’चं ज्याप्रकारे प्रमोशन करण्यात आलं होतं, ते पाहून हा चित्रपट दणक्यात कमाई करेल असा विश्वास निर्माते-दिग्दर्शकांना होता. देशातील १७ विविध शहरांमध्ये विजय आणि अनन्याने जोरदार प्रमोशन केलं होतं. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. मात्र विजयची ही जादू चित्रपटगृहात काही दिसली नाही.

“जानेवारी २०२० मध्ये लायगरच्या फर्स्ट शेड्युलचं शूटिंग सुरू झालं. २०१९ मध्ये आम्ही करण जोहरला भेटलो होतो आणि चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी २०२२ उजाडला. ‘लायगर’ थिएटरमध्येच प्रदर्शित केला जावा असा आमचा अट्टहास होता, म्हणूनच आम्ही तीन वर्षे वाट पाहिली”, असं चार्मी म्हणाली. पुरी जग्गनाथ दिग्दर्शित ‘लायगर’ची निर्मिती पुरी आणि चार्मी कौर यांनी केली. तर करण जोहर या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली करणने लायगरच्या हिंदी चित्रपटाचं प्रमोशन केलं.

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी १.२५ कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी – शुक्रवारी ४.५० कोटी, शनिवारी ४.२५ कोटी गल्ला जमवला. रविवारी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे ‘लाइगर’ च्या कमाईत घट दिसली. रविवारी या चित्रपटाने केवळ ३.७५ कोटींचा बिझनेस केला. सोमवारी हा आकडा १.३५ कोटींवर आला. म्हणजेच, पाच दिवसांत चित्रपटाने केवळ १५.१० कोटी कमावले.

Liger Movie Flop in Box Office Show Cancelled
Collection Bollywood Vijay Devarkonda

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा मेळाव्यावरुन सुरू असलेल्या वादाबाबत शरद पवार म्हणाले….

Next Post

या पठ्ठ्यानं थेट विमानंच चोरलं आणि आता देतोय ही धमकी (Video)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Capture 11

या पठ्ठ्यानं थेट विमानंच चोरलं आणि आता देतोय ही धमकी (Video)

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011