इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाला भविष्याची काळजी वाटते, त्यामुळे कदाचित भविष्यात येणाऱ्या अडचणी तथा संकटांसाठीची काहीतरी गुंतवणूक किंवा पैशांची तरतूद असावी म्हणून अनेक नागरिक भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसी पॉलिसी घेतात. परंतु नॉमिनी बाबत एलआयलसीचा बदललेला हा नियम सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे. तो नियम जाणून घेतला नाहीतर भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबीयांना क्लेम केलेली रक्कम मिळवण्यात अडचण येऊ शकते.
सध्या तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल किंवा आणखी नवीन पॉलिसी घ्यायचा विचार करत असाल तर प्रत्येकाने कोणत्याही गुंतवणुकीसाठी किंवा पॉलिसी घेताना नॉमिनेशन करावे हा नियम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, या शिवाय एकाच नॉमिनीपर्यंत न थांबता क्रमिक नामनिर्देशन किंवा निश्चित नॉमिनेशनही करणे गरजेचे आहे असे दिसून येते.
विमा कायद्यानुसार टर्म विमा आणि पारंपरिक पॉलिसींसाठी बहुनामनिर्देशन (मल्टिपल नॉमिनेशन) ही सुविधा देण्यात आली आहे. मल्टिपल नॉमिनेशनमध्ये पॉलिसीधारक एकाचवेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींना नॉमिनी करू शकतो. त्यामुळे पॉलिसीची रक्कम सर्व नॉमिनींमध्ये प्रत्येक नॉमिनीसाठी दिलेल्या टक्केवारीनुसार विभागून दिली जाते.
पॉलिसी खरेदी करताना, कुटुंबातील सदस्याला नॉमिनी बनवले आवश्यक आहे. आता एलआयसीने हा नियमही अनिवार्य केला असून जर तुम्ही पॉलिसी घेताना नॉमिनी केले नसेल आणि तुमच्यासोबत एखादी दुर्घटना घडली असेल, तर तुमच्या कुटुंबीयांना रकमेपासून वंचित राहावे लागू शकते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पॉलिसीचा क्लेम मिळण्यात कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अनावश्यक विवाद सुद्धा टाळता येतील.
एलआयसी पॉलिसी खरेदी करताना आता हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. कारण कदाचित पॉलिसीधारकाचा भविष्यात अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला थेट मदत मिळण्यास यामुळे मदत होते. नॉमिनी बनवताना जर दोन व्यक्तींमध्ये पैसे विभागायचे असल्यास पॉलिसी खरेदी करताना एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हिस्सा ठरवून नॉमिनी बनवू शकतात. अशावेळी कंपनीला लेखी हमीपत्र देखील सादर करावे लागू शकते.
अनेक जण आपल्या जोडीदाराला आपला नॉमिनी बनवतात. पण जर तुमचे पैसे दोन जणांमध्ये विभागायचे असतील. म्हणजे पत्नी आणि मुलगा किंवा पत्नी आणि भाऊ किंवा आई. अशावेळी, तुम्ही एकापेक्षा जास्त पॉलिसी खरेदी करू शकतात किंवा दोन वेगळ्या पॉलिसींसाठी वेगवेगळे नॉमिनी तयार करू शकता. पॉलिसी घेताना नॉमिनीचे नाव ठरवा. परंतु लक्षात ठेवा की पॉलिसीसाठी योग्य नॉमिनी निवडणे देखील खूप महत्वाचे आहे.
पॉलिसीधारकांना कालानुक्रमे नॉमिनी बदलण्याची मुभा देखील देण्यात येते. नॉमिनीच्या आकस्मिक मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून निवडता येते. तसेच विवाह किंवा घटस्फोटानंतरही आपल्याला आपला नॉमिनी बदलता येतो. विमा कंपनीच्या वेबसाईटवरुन नॉमिनी फॉर्म डाऊनलोड करुन भरता येतो. नॉमिनीचे डिटेल्स यामध्ये भरुन आपल्याला नॉमिनीची निवड करता येते.
LIC Policy Rule Change Nominee Benefits
Insurance