इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज आहे. कोणत्याही माहितीसाठी उठसूठ एलआयसीच्या कार्यालयात जाण्याची, अधिकृत वेबसाईटवरून क्लिष्ट पद्धतीने माहिती मिळविण्याची किंवा एजंटसोबत बोलणी करण्याची गरज राहणार नाही. अनेक सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे. यामुळे हवी तेव्ही, हवी ती माहिती पॉलिसीधारकांना एका क्लिकवर मिळू शकणार आहे.
ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एलआयसीने व्हॉट्सअॅपसोबत भागीदारी केली आहे आणि 24 बाय 7 इंटरएक्टिव्ह सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे. आता पॉलिसीधारक एलआयसीशी संबंधित सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात. काही निवडक सेवा व्हॉट्सअपवर मिळतील. एलआयसीचे सध्या 25 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. त्यांना या सेवांचा लाभ घेता येईल.
कशी असेल प्रक्रिया?
घरबसल्या एलआयसी सेवेचा लाभ घेण्यासाठी 8976862090 क्रमांकावर ‘HI’ टाइप करून व्हॉट्सअॅप करावे लागेल. यानंतर एलआयसी कडून कोणकोणत्या सेवा मिळतील त्याची यादी पाठवली जाईल. त्यापैकी कोणतीही एक सेवा निवडावी लागेल. कोणतीही सेवा निवडल्यानंतर संबंधित उत्तर किंवा त्याबद्दलची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळेल.
11 सेवांचा लाभ
प्रथम पॉलिसीधारकांना पॉलिसी एलआयसी पोर्टलवर नोंदवावी लागेल. नंतरच व्हॉट्सअॅपद्वारे या सेवांचा लाभ घेता येईल. नंतरच बोनससंदर्भात माहिती, किती प्रीमियम देय शिल्लक आहे, पॉलिसी स्टेटस, लोन घेण्यासाठी पात्रता, कर्जाची परतफेड, कर्ज थकीत व्याजदर, प्रीमियम सशुल्क प्रमाणपत्र, युलिप स्टेटमेंट ऑफ युनिट, एलआयसी सेवांची माहिती घेता येऊ शकेल.
बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी
एलआयसीची रिव्हायवल मोहीम 1 फेब्रुवारी ते 24 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत कालबाह्य झालेली जीवन विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येईल. एलआयसीने या संदर्भात एक ट्वीट देखील केले आहे, 1 लाखांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कात 25 टक्के सूट देण्यात आली आहे. तर 3 लाखांपर्यंतच्या प्रीमियमवर पॉलिसीधारकाला 25 टक्के सूट दिली जाईल. त्याचप्रमाणे एलआयसी तीन लाखांपेक्षा जास्त प्रीमियमवर 30 टक्के सूट देत आहे.
LIC Policy Holder 11 Services from Home
Whatsapp