इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करावे. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी. तुमच्या या स्वप्नाला पूर्ण करेल भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ची कन्यादान पॉलिसी. ज्याद्वारे तुम्ही दररोज १२१ रुपये जमा करून तब्बल २७ लाख रुपये जमा करू शकता.
चला तर जाणून घेऊया या पॉलिसीबद्दल…
एलआयसीची कन्यादान पॉलिसी जगातील पहिली अशी कन्यादान योजना आहे, ज्यामध्ये वडिल न राहिल्यास प्रीमियम घेतले जात नाही. पण कन्यादानाचा पैसा दिला जातो. यासोबत शिक्षणाचा खर्च देखील याद्वारे दिला जातो.
कन्यादान पॉलिसीअंतर्गत तुम्ही दररोज १२१ रुपये जमा केले तर २५ वर्षानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील.
दररोज १२१ रुपये म्हणजे महिन्याचे एकूण ३६०० रुपये तुम्हाला भरावे लागतील. २७ लाख रुपये तुम्हाला २५ वर्षानंतर मिळतील. पण पॉलिसीअंतर्गत तुम्हाला २२ वर्षे हफ्ता भरावा लागेल.
हे लक्षात ठेवा की या पॉलिसीला तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुमचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल. यासोबत तुमच्या मुलीचे वय कमीत कमी एक वर्षे असायला हवे.
या पॉलिसीची खास बाब म्हणजे, आपल्या गरजेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त प्रीमियमचा (हफ्ता) प्लॅन घेऊ शकता.