संजय कोकाटे, नाशिक
दि एलआयसीआय नाशिक डिव्हिजनल एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. खरं तर कामगार आणि कर्मचा-यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हा सोसायटी स्थापनेसाठीचा हेतू आहे. तत्कालीन नेत्यांनी या सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. “बचतीतून समृध्दी” हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन ही पतसंस्था सुरू झाली.
कधी काळी अशी परिस्थिती होती की कर्जासाठी रांगेत अर्ज असायचे.. “पाल्याची फी भरायची, त्याला गणवेश, दप्तर घ्यायचं, घरातील कुणी आजारी पडलं तर त्या व्यक्तीच्या दवाखान्याचा खर्च करायचा… भांडी-कुंडी, किराणा अशी अनेक कारणं असायची. त्याशिवाय मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, वाहन खरेदी आदी अनेक कारणे असायची…
या सर्व गरजांच्या पुर्ततेसाठी अनेकांनी मदत केली. अर्थात हे शक्य झालं केवळ तत्कालीन संघटनेत काम करणा-या नेत्यांमुळे. या सर्व नेत्यांची नाळ समाजकार्यासाठी जोडली होती. त्यामुळेच १९६० साली या पतसंस्थेच्या स्थापना झाली. तोच हेतू ठेऊन आजपर्यंत मार्गक्रमण झालं आणि पुढेही होत राहील.
संस्थेचा कारभार हा धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आहे. संस्थेचे एकूण ८१३ सभासद आहेत. मासिक वर्गणी आणि एकूण भरणा झालेल्या भागभांडवलाने ५.४० कोटींची मर्यादा ओलांडली आहे. नियमित कर्ज ८ लाख, शैक्षणिक कर्ज २.५० लाख आणि प्रासंगिक कर्ज रू ५० हजार असा ताळमेळ कुठल्याही बॅंकेकडून कॅश- क्रेडीट सुविधा न घेता साधला आहे. ३१.०३.२०२२ अखेरीस संस्थेने साधारणत: ६३ लाख नफा मिळवून ९% दराने लाभांश सभासदांना दिला. आणि तो ऑनलाईन पध्दतीने सभासदांच्या खात्यात वर्ग झाला.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती अशी:
कर्ज पुरवठा: २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात केलेला अर्ज पुरवठा —
नियमित कर्ज.. रू ४ कोटी १९ लाख
प्रासंगिक कर्ज.. रू १लाख ३५ हजार
शैक्षणिक कर्ज ..रू ५१ लाख ७१ हजार
भागभांडवल : भरणा झालेल्या भागभांडवलाची रक्कम रू.५ कोटी ३७ लाख ५५ हजार ८६० आहे
संस्थेकडे असलेल्या मुदत ठेवी : रू ७८ लाख ४८हजार ५००
मासिक बचत योजना: डिसेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील मासिक बचत योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम रू. १ कोटी ८० लाख
१ जानेवारी २०२२ रोजी सर्व सभासदांच्या खात्यात नेफ्ट प्रणाली द्वारे विक्रमी वेळेत जमा.
विशेष राखीव निधी : ३१.०३.२०२२ अखेर रू. २ कोटी १० लाख १९ हजार ३५८ इतकी विशेष राखी निधी रक्कम संस्थेच्या बॅंक खात्यात जमा आहे. वार्षिक नफा : रू ६२ लाख ५६ हजार
विशेष निधी कडे वर्ग : रू १५ लाख ६४ हजार
डिव्हीडंड इक्वलायझेन फंडात जमा करावयाची रक्कम वजा करुन ४५ लाख ६७ हजार १७५ इतकी रक्कम लाभांशाच्या रुपाने ९% दराने सभासदांच्या खात्यात नेफ्टद्वारे जमा..
डेथ रिलीफ फंड..आर्थिक वर्षात ३ सभासदांचा मृत्यू झाला.सांत्वना म्हणून प्रत्येकी रू ५०००/- असे एकूण रू.१५,०००/- वारसांना अदा केले.
विशेष म्हणजे थकित कर्जाची रक्कम निरंक.
पतसंस्थेने तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. शिवाय सातत्याने ऑडिट रेटींग “अ” मिळविले आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळता फक्त दोन महिला कर्मचारी कार्यरत आहेत. एलआयसी व्यवस्थापनाने अगदी नाममात्र दरात कार्यालयासाठी जागा दिलेली आहे. कुठलाही बडेजाव नाही, प्रसिध्दीसाठी फोटो नाहीत, निवडणुकीवर प्रचंड खर्च आणि दमछाक नाही, अशी ही आदर्शवत पतसंस्था आहे. संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याकामी सर्व संघटनांच्या पदाधिका-यांनी एकीचं प्रदर्शन दाखवलं. त्यात शेखर मोघे, मिलींद मिसर, दिलीप आंधळे, मंगेश खंबाईत, माया बर्वे, नितीन पवार, पी जी जोशी, आदिती बेंद्रे, नितीन विखार, मोहन देशपांडे,स्मिता कुलकर्णी आदींचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सतीश खरे (जिल्हा उपनिबंधक) यांचे नेतृत्वाखाली वृषाली मैंद यांनी अगदी चोख आणि प्रभावीपणे पार पाडली. बिनविरोध निवडीचा हा पायंडा आदर्शवतच आहे.
बिनविरोध निवडून आलेले संचालक असे:
एकूण १८ जणांच्या कार्यकारिणीत ४ महिला असून त्यातील एक व्हाइस चेअरपर्सन तर दुसरी सहसचिव आहे. केदार जोशी (चेअरमन), सुनिता पाटेकर (व्हाइस), संदीप अघोर (सचिव) तर सविता कर्डिले, दुशांत शिंदे हे सहसचिव म्हणून पुढील कामकाज पाहतील. संपूर्ण संचालक मंडळ असे – केदार जोशी, सुनिता पाटेकर, संदीप अघोर,सविता कर्डिले, दुशांत शिंदे,सुनिल वसईकर,हेमंत संधान, वर्षा किन्हीकर,जगदीश माळवे, शैलेश ढेपे,भरत म्हस्के, अनुप कारंजकर,राजेंद्र ठोंबरे, नितीन विखार,वर्षा संत,भरत तेजाळे, महेश मोरे,राजेंद्र कापसे.
संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्याकामी सर्व संघटनांच्या पदाधिका- यांनी एकीचं दर्शन घडवलं…त्यात शेखर मोघे (फेडरेशन) मिलींद मिसर ,दिलीप आंधळे (विकासाधिकारी संघटना) मंगेश खंबाईत,माया बर्वे (एस.सी.एस.टी. असोसिएशन) नितीन पवार, पी. जी.जोशी ( एन.ओ.आय.डब्ल्यू) आदिती बेंद्रे (क्लास वन फेडरेशन) , मोहन देशपांडे (विमा कर्मचारी संघटना) स्मिता कुलकर्णी ( बी.एम.एस.) नितीन विखार,भरत तेजाळे (कामगार सेना) आदींचा समावेश आहे.
LIC Nashik Employees Credit Society Election Article