इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC)च्या आयपीओसाठी अनेकांनी बोली लावली आहे. त्यामुळे आता शेअर्स कधी मिळणार याची उत्सुकता बोली लावणाऱ्यांना आहे. एलआयसीच्यावतीने १२ मे रोजी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. एलआयसी ही कंपनी येत्या १७ मे रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. एलआयसीचा आयपीओ मिळाला की नाही हे तपासण्यासाठी आपण खालील पद्धतीचा अवलंब करा.
– सर्वप्रथम www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
– तुम्ही ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा
– हा पर्याय निवडल्यानंतर ड्रॉपडाउनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा
– आता नवीन पेज ओपन होईल. तेथे तुमचा अर्ज क्रमांक नमूद करा
– तुमचा पॅन कार्ड क्रमांक नमूद करा
– ‘I am not a robot’ हा पर्याय दिसेल. व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा
– LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील