मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – LIC च्या IPO ची सदस्यता सोमवारी (9 मे) बंद झाली आहे. विमा कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे टाकणाऱ्या गुंतवणूकदारांच्या नजरा आता शेअर वाटपाच्या घोषणेवर खिळल्या आहेत. उद्या गुरुवारी (12 मे) शेअर्सचे वाटप होऊ शकते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओच्या प्रीमियममध्ये सातत्याने घट होत आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, बुधवारी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचे शेअर्स 8 रुपयांच्या सवलतीवर आहेत. म्हणजेच एलआयसीचे शेअर्स प्राइस बँडवरून 8 रुपयांनी खाली आले आहेत. ग्रे मार्केटमध्ये प्रचलित असलेले दर सूचित करतात की LIC चे शेअर्स प्राइस बँडच्या खाली सूचीबद्ध केले जाऊ शकतात.
रेड झोनमध्ये आला
अभ्यासक आणि तज्ज्ञांचे मत आहे की, दुय्यम बाजारातील कमकुवत भावनांमुळे, LIC च्या IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम गेल्या 1 आठवड्यात खाली आला आहे आणि तो आता रेड झोनमध्ये गेला आहे. एलआयसीच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम बुधवारी उणे ८ रुपये (रु-८) वर पोहोचला. बुधवारी, LIC च्या IPO च्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये 33 रुपयांनी घट झाली आहे. मंगळवारी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओचा प्रीमियम 25 रुपये होता.
एलआयसीच्या आयपीओसाठी सबस्क्रिप्शन उघडण्यापूर्वी, ग्रे मार्केटमध्ये त्याचा प्रीमियम 92 रुपये होता. तथापि, जागतिक बाजारातील भावना नकारात्मक झाल्यानंतर IPO च्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये सातत्याने घट होत आहे. ग्रे मार्केट डिस्काउंट म्हणजे विमा कंपनीचे शेअर्स वाटप किमतीच्या खाली सूचीबद्ध केले जाऊ शकतात. जर LIC चे शेअर्सचे वाटप 949 रुपयांच्या वरच्या बँडवर केले गेले तर आजच्या सवलतीनुसार, LIC शेअर्सची एक्स्चेंजवर सूची सुमारे 941 रुपये असू शकते. LIC चा IPO 2.95 पट खरेदी करण्यात आला आहे. त्याचा किरकोळ भाग 1.99 पट विक्री झाला. त्याच वेळी, एलआयसी पॉलिसीधारकांनी तब्बल 6.12 पट आयपीओ खरेदी केला आहे. तर कर्मचाऱ्यांनीही तब्बल ४.४० पट अधिक खरेदी केली आहे.