विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) २५ हजार कोटी रुपये जमा करणार आहे. Anchor investor च्या माध्यमातून ही रक्कम गोळा करायची आहे. त्यासाठी कंपनीकडून आपल्या बोर्ड आराखड्यात बदल करणार आहे. तसेच काही नियमांमध्येही बदल करणार आहे.
कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने एलआयसीच्या लोगोचा दुरुपयोग केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोणतेही संकेतस्थळ, प्रकाशक, डिजिटल संस्थांनी पूर्वपरवानगीशिवाय एलआयसीचा लोगो वारण्यावर निर्बंध घातल्याचे एलआयसीच्या ट्विटर अकाउंटवर सांगण्यात आले.
६५ वर्ष पूर्ण झालेल्या एलआयसी लवकरच आयपीओच्या माध्यमातून पैसे गोळा करणार आहे. एलआयसीच्या लोगोचा गैरवापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियावर एलआयसीने दिलेल्या इशार्यात म्हटले की, एलआयसीच्या लोगोचा अनधिकृत वापर करू नये. एलआयसीची १९५६ साली स्थापना करण्यात आली होती. देशातील एकूण ६८.९० टक्के बाजारात भागिदारी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी जाहीर केल्यानुसार, एलआयसीने या वर्षी ऑक्टोबरच्या जवळपास एक आयपीओ करण्याची योजना तयार केली आहे.