नवी दिल्ली – विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा बहुप्रतिक्षित आयपीओ डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. यासाठी मुल्यांकनाचे काम वेगाने सुरू असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांनी सांगितले. शेअर बाजारच्या लिस्टिंगवर आल्यावर ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनेल असा अंदाज आहे.
एम.आर. कुमार म्हणाले की, आयपीओच्याही पूर्वी कंपनीचे मूल्यांकन आवश्यक आहे. यासाठी सॉफ्टवेअर आणि मूल्यांकन फर्मची गरज आहे. यावरच सध्या आमचे काम सुरू आहे. दरम्यानचया काळात सरकारला एलआयसी कायदा १९५६ मध्ये काही बदल करावे लागतील.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आम्हाला २०२१-२२च्या तिसऱ्या तिमाही पर्यंतची वेळ दिली आहे. आणि आमचे काम त्याच अनुषंगाने सुरू आहे. सध्याचे आर्थिक वर्ष संपेपर्यंत कंपनीची गुंतवणूक जवळपास ५ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
एलआयसीचा आयपीओ म्हणजे काय?
एलआयसीचा आयपीओ म्हणजे सरकार आता शेअर बाजारमध्ये एलआयसीचा समावेश करणार आहे. कंपनीच्या आयपीओमुळे तिचे आर्थिक मूल्य लक्षात येईल. यानंतरही एलआयसीवर संपूर्णपणे सरकारचा अधिकार राहणार आहे.