इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दैनंदिन जीवन जगताना प्रत्येक नागरिकाला आपल्या भविष्याची देखील चिंता असते. त्यामुळे आजचा व्यवहार, कामकाज, व्यवसाय, व्यापार तथा उद्योग – धंदा आदी कार्य करत असतानाच आपले आजचे आरोग्य, आहार – विहार, तसेच कपडे, घर किंवा वाहन खरेदी या गोष्टींमध्ये प्रत्येक जण आनंद घेत असतो. त्याच बरोबर त्याला उद्याची भविष्याची देखील चिंता असते.
सहाजिकच याकरिता उद्याची बचत म्हणून आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेणारी एखादी योजना असावी, याकरिता प्रत्येक जण विचार करतो. तेव्हा एकच आणि एकमेव सर्वाधिक चांगला पर्याय म्हणजे एलआयसी हा समोर येतो, असे बहुतांश नागरिकांचे मत आहे. त्याकरिता सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने जीवन शिरोमणी पॉलिसी सुरू केली आहे. कमी गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांची हमी हमी हवी असल्यास. मग ही पॉलिसी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये तुम्हाला 1 रुपयाच्या बदल्यात प्रचंड नफा मिळतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन शिरोमणी पॉलिसीबद्दल जाणून घेऊ या…
अशी आहे योजना
जीवन शिरोमणी पॉलिसी ही लिंक नसलेली, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे. त्याची सुरुवात LIC ने दि. 19 डिसेंबर 2017 रोजी केली होती. जीवन शिरोमणी पॉलिसी गंभीर आजारांसाठी देखील संरक्षण प्रदान करते. यासोबतच किमान 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमीही आहे.
आर्थिक सहाय्य
पॉलिसीधारकांना LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत मृत्यू लाभ मिळतो. यामध्ये पॉलिसीधारकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. याशिवाय, या पॉलिसीमध्ये टिकून राहिल्यास, निश्चित मुदतीदरम्यान पेमेंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि परिपक्वतेवर एकरकमी रक्कम उपलब्ध आहे.
पेमेंटची प्रक्रिया
= 14 वर्षांची पॉलिसी -10वे आणि 12वे वर्ष विम्याच्या 30-30 टक्के
= 16 वर्षांची पॉलिसी -12वे आणि 14वे वर्ष विमा रकमेच्या 35-35 टक्के
= 18 वर्षांची पॉलिसी – 14वे आणि 16वे वर्ष विमा रकमेच्या 40-40 टक्के
= 20 वर्षांची पॉलिसी – 16 व्या आणि 18 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 45-45 टक्के.
कर्ज
या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे कर्ज घेऊ शकतो. पण हे कर्ज फक्त एलआयसीच्या अटी आणि शर्तींवरच मिळेल. तसेच पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणार्या व्याजदरावर उपलब्ध असेल.