मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीच्या नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना असतात, तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्स कडून कर्ज देखील मिळते. विशेषतः होम लोन कर्ज सहज उपलब्ध होते. मात्र आता या होम लोनचे दर वाढणार असल्याने कर्जदाराच्या कर्जदारांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.
एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून लोन घेतले असेल तर आता जास्त ईएमआयचा ताण ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. कारण एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत म्हणजेच आतापासून अधिक ईएमआय भरावे लागेल. एलएचपीएलआर हा प्रत्यक्षात मानक व्याज दर आहे ज्याशी एलआयसी एचएफएल कर्जाचा व्याजदर जोडलेला एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जाच्या व्याजदरात ६० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या निर्णयानंतर आता एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून कर्ज घेणाऱ्यांना आता ७.५० टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. एलआयसीने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. एलआयसी हाऊसिंगने आपला प्राइम लेंडिंग रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. हा दर सोमवार, 22 ऑगस्टपासून लागू करण्यात आलाय. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एलआयसी हाउसिंग फायनॅन्सने हा निर्णय घेतला आहे. प्राईम लेंडिंग रेटशी निगडीत गृहकर्जासाठी EMI आता वाढणार आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय विचार करायला लावणारा आणि जागतिक आर्थिक ट्रेंडच्या अनुषंगाने होता. रेपो रेट वाढल्याने, EMI किंवा टेन्योरमध्ये थोडासा बदल होणार आहे,” अशी प्रतिक्रिया एलआयसी हाउसिंग फायनान्सचे एमडी आणि सीईओ वाय विश्वनाथा गौड यांनी दिली. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एलआयसी हाउसिंगच्या होमलोनसाठी आता नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होतील. यापूर्वी ते 7.50 टक्के होते.
वेबसाइटनुसार, एलआयसी हाउसिंग 8.05 टक्के दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे होमलोन आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतचे होमलोन 8.25 टक्के दराने देते. हा व्याजदर त्या पगारदार आणि व्यावसायिकांसाठी आहे ज्यांचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक आहे.
600 ते 699 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.30 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी ८.५० टक्के व्याजदर आहे. 600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.75 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.95 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गेल्या महिन्यातही गृहकर्जाचे व्याजदर वाढवले होते. मात्र, क्रेडिट स्कोअरनुसार व्याजदरात वाढ करण्यात आलेली ही वाढ शेवटची होती. ७०० पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी गृहकर्जाच्या व्याजदरात २० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी २५ बेसिस पॉइंट्स वाढवण्यात आले. तसेच या महिन्याच्या ८ तारखेला आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपोमध्ये वाढ केल्यापासून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतील, असे मानले जात होते.
LIC HFL Home Loan rate of Interest Increased
Finance Banking EMI