नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने नागरिकांच्या भविष्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेणे गरजेचे असते मुख्य म्हणजे त्यासाठी योजना समजून घेणे आवश्यक ठरते. कारण आपले भविष्य सुखकर करण्यासाठी अनेक जण धडपडतात. पण आयुष्याच्या शेवटच्या काळात शांततेत जगण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे. उशीरा नियोजन केल्याने वाढता खर्च आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ बसत नाही आणि मग त्रागा केल्याशिवाय हाती काही उरत नाही. आपण लवकरच रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर एलआयसीची ही योजना उपयोगी ठरु शकते.
देशातील सर्वात मोठी आणि सरकारी मालकीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने अनेक योजना बाजारात उतरवल्या आहेत. आज निवृत्तीसाठी गुंतवणूक करणं हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. एलआयसीने एक पॉलिसी सुरू केली आहे, जीवन अक्षय असे नावं असलेल्या या योजनेतंर्गत निवृत्तीनंतर दरमहा २० हजार रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करता येते. या पॉलिसीतील पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडू शकता. पेन्शन व्यतिरिक्त या योजनेचे इतरही फायदे आहेत. गुंतवणूक करताच तुम्हाला पॉलिसी बाँड मिळतो, गुंतवणुकीनंतर पैशांची गरज असेल तर तीन महिन्यांच्या गुंतवणुकीनंतर कर्जासाठीही अर्ज करता येतो. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
जीवन अक्षय पॉलिसी ही सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग पॉलिसी आहे, गुंतवणूकदाराला पॉलिसीमध्ये किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. एक लाख रुपये एकरकमी जमा केल्यास वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. 35 ते 85 वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत 20,000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी पर्याय निवडावा लागेल.
एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये ग्राहकांना गुंतवणुकीचा आणि दरमहा रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केवळ एक प्रीमियम जमा केल्यावर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळण्याचाही पर्याय आहे. दर महिन्याला पेन्शन घ्यायची असेल तर मासिक पर्याय स्वत:च निवडावा लागेल. दरमहा 20 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर या योजनेत 4 लाख 72 हजार रुपये एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली होती. या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये एकदाच प्रीमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकता. ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर तुम्ही कधीही कर्ज घेऊ शकता हे आणखी एक वैशिष्ट्ये या पॉलिसीतंर्गत लाभधारकांना मिळते. ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेतील लाभधारकाला मासिक 12 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते.
LIC Policy 20 Thousand Pension Monthly
LIC Jeevan Akshay Plan
LIC Anniversary Today 20 Thousand Monthly Pension