विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
कोविड -१९ साथीमुळे, बँकेशी संबंधित बरीच कामे आता ऑनलाइन पध्दतीने केली जात आहेत. आपण भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) पॉलिसी खरेदी केली असेल तसेच प्रीमियमची देय तारीख जवळ आली असेल, तर त्याचा प्रीमियम भरण्यासाठी केंद्रात जाण्याची गरज नाही. आपण घरी बसून प्रीमियम देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून LIC पे डायरेक्ट अॅप डाउनलोड करावे लागेल. या अॅपद्वारे तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल. काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या…प्ले स्टोअर वरून LIC पे डायरेक्ट अॅप डाउनलोड करा. यानंतर तुम्हाला पे प्रीमियम वर टॅप करावे लागेल. त्यानंतर काही माहिती विचारली जाईल. त्यानंतर पूर्ण तपशील तपासा आणि इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
एलआयसी प्रीमियम ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया अशी आहे. यासाठी सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाईट (licindia.in) वर जा. पहिल्या पानावर आल्यानंतर ऑनलाईन पे प्रीमियम वर जा. येथे दोन प्रकारे प्रीमियम भरू शकता.डायरेक्ट पे (लॉगिनशिवाय) थेट पेमेंट करा किंवा ग्राहक पोर्टलद्वारे पे करा. लॉग इन न करता पेमेंट करण्यासाठी, प्रथम पे डायरेक्ट वर क्लिक करा. पुढील पेज उघडेल. यात दोन प्रकारचे व्यवहार करू शकता: प्रीमियम पेमेंट किंवा पॉलिसी रिव्हायल, कर्जाची परतफेड आणि व्याज पेमेंट. प्रीमियम पेमेंटवर क्लिक करा आणि तुमचा पॉलिसी नंबर, प्रीमियम रक्कम, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर सोबत सिक्युरिटीचा कोड एंटर करा आणि आय अॅग्री वर क्लिक करून सबमिट क्लिक करा. त्यानंतर प्रीमियम तपशील भरा आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर येऊन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता. ग्राहक पोर्टलद्वारे पेमेंट करण्यासाठी, प्रथम ग्राहक पोर्टलवर क्लिक करा. यानंतर, ग्राहक पर्याय निवडून तुमचा रोल सबमिट करा आणि तुमचा युजर आयडी किंवा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका. नंतर चेक आणि पे वर क्लिक करा, पेमेंट गेटवे निवडा आणि प्रीमियम भरा. येथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि यूपीआय द्वारे पेमेंट करू शकता.