नवी दिल्ली – भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) एक नवीन योजना आणली आहे. ही एक संलग्न नसलेली किंवा भागीदारी नसलेली वैयक्तिक बचत योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकास संरक्षणासह बचत करण्याचा पर्याय मिळाला आहे. ‘बीमा ज्योती’ असे या नव्या योजनेचे नाव आहे.
‘बीमा ज्योती’ या योजनेंतर्गत मॅच्युरिटी नंतर एक वेळ देय दिले जाईल. त्याच वेळी, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जाईल. प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस, मूळ रकमेवर प्रति हजार रुपये अतिरिक्त दिले जातील.
एलआयसीने म्हटले आहे की, किमान मूलभूत निश्चित रक्कम एक लाख रुपये असेल. ही योजना १५ ते २० वर्षांसाठी घेतले जाऊ शकते. वय वर्ष ९० दिवस वयोगटातील किंवा ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती ही योजना घेऊ शकतील.
बचत आणि सुरक्षा कवच असा दुहेरी लाभ देणारी बिमा ज्योती ही योजना बाजारात आणली आहे. भांडवली बाजाराशी जोडलेली नसलेली ही नॉन लिंक, नॉन पार्टीसिपेटिंग, वैयक्तिक, बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत मुदत समाप्तीनंतर एक रकमी रक्कम आणि पॉलीसीच्या मुदत कालावधीत धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वित्तीय पाठबळही देऊ करते.
पॉलिसीच्या मुदत कालावधीपर्यंत प्रत्येक वर्षाच्या अखेरीला, हजार रुपयामागे ५० रुपये या दराने निश्चित हमीने रक्कमेत भर घातली जाईल. जोखीम सुरु झाल्याच्या तारखेनंतर पॉलिसीच्या मुदत कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास,’सम अश्यूअर ऑन डेथ’आणि पॉलीसीच्या अटीनुसार हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे.
पॉलिसीची मुदत संपण्याच्या तारखेला जीवित पॉलीसीधारकाला परिपक्वतेच्या वेळी प्रदान करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि हमीने भर घालण्यात आलेली जमा रक्कम देय आहे. विशिष्ट अटींच्या अधीन, मृत्यू/मुदत समाप्ती संदर्भातले लाभ हप्त्याने घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
या पॉलिसीसाठी किमान ‘सम अश्यूअर’ १ लाख रुपये असून कमाल मर्यादा नाही. प्रीमियम देण्याची मुदत पॉलीसीचा कालावधी वजा पाच वर्षे राहील. वयाची मर्यादा किमान ९० दिवस पूर्ण आणि कमाल ६० वर्षे आहे. हप्ता वार्षिक, अर्ध वार्षिक, त्रैमासिक आणि मासिक ( मासिक हप्ता केवळ एनएसीएच मार्फत) किंवा वेतनातून कापून दिला जाऊ शकतो. कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
घटत्या व्याज दराच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर जोखीम कवचासह रकमेत हमीने निश्चीत घालण्यात येणारी निश्चित भर हे एलआयसीच्या बिमा ज्योतीचे आगळे वैशिष्ट्य आहे.
सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी विभाग देशात अव्वल ठरला असून सिंगल प्रीमियम आणि प्रथम वर्ष प्रीमियम इनकम बजेट( एफवायपीआय) आधीच पूण केले आहे. ग्राहकांच्या समाधान पूर्तीसाठी गोवा एलआयसी कटीबद्ध आहे, असे एलआयसीने कळविले आहे.
अधिक माहितीसाठी – वसंत युवराज चव्हाण मो. 9922435400 किंवा 9890366930