पणजी – भारतीय आयुर्विमा महामंडळाने आनंद – (ANANDA) या डिजिटल अॅप्लिकेशनचा प्रारंभ केला आहे, जे विलक्षण बदल घडवून आणू शकेल, एल आय सी च्या आजपर्यंतच्या काळातील ही ऐतिहासिक घटना आहे, हे अॅप्लिकेशन हे सिद्ध करणार आहे असे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी ऑफ इंडिया) पश्चिम विभागाचे विभागीय व्यवस्थापक सी विकास राव यांनी सांगितले. अध्यक्ष एम आर कुमार यांच्या हस्ते अप्लिकेशनचा प्रारंभ करण्यात आला.
ANANDA हे एल आय सी च्या एजंटांना पूर्णपणे सक्षम करणारे अॅप्लिकेशन असून त्यामुळे त्यांना ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष न जाता देखील वीमा प्रक्रिया पूर्ण करता येईल. या प्रक्रियेत ग्राहकाचा मोबाईल क्रमांक त्याच्या आधार क्रमांकासह जोडला जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सी विकास राव यांनी दिली.
आजचा कठीण आणि आव्हानात्मक काळ पाहता, प्रस्ताव पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत सुलभता येण्यासाठी एलआयसीने एक अनोखा आणि योग्य वेळेत पुढाकार घेतला आहे, जो पूर्णपणे कागदपत्र विरहित आणि पूर्णपणे डिजिटल आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात रूपांतर करताना प्रत्यक्ष हाताळण्याच्या सर्व बाबी यात समाविष्ठ केल्या आहेत.
या अॅप्लिकेशनला एल आय सी च्या सर्व एजंटांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि येत्या काही दिवसांत कंपनीच्या व्यवसायिक कामगिरीमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसेल.
विभागीय व्यवस्थापक सी विकास राव, यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमधील नागरिकांना आवाहन केले आहे की, या अप्लिकेशनचा उत्तम फायदा करून घेत, एलआयसीवरील त्यांचा विश्वास नागरिकांनी असाच कायम ठेवावा आणि एलआयसीमार्फत स्वतःचा विमा उतरवावा आणि स्वतःला सुरक्षित करावे.