इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोरोक्कोमध्ये भूकंपाच्या धक्क्याने दोन हजार लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच तिकडे लिबियामध्ये आलेल्या भयंकर पुरात हजारो लोक वाहून गेले आहेत. आतापर्यंत तीन हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असले तरीही अद्याप १० हजार लोक बेपत्ता आहेत.
लिबियामध्ये आलेल्या डॅनियल वादळानंतर प्रचंड पाऊस आला आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली. या पावसाचा जोर एवढा होता की येथील दोन मोठी धरणे फुटली. मुख्य म्हणजे लिबियाच्या पुर्वेकडील र्डेना शहराच्या जवळपास एक चतुर्थांश भाग पूर्णपणे पुरात वाहून गेला आहे. त्यात देखील अनेक लोकांचा जीव गेल्याची नोंद करण्यात आली. एकट्या र्डेना शहराच १ हजारापेक्षा जास्त मृतदेह हाती लागले आहेत. आणि एकट्या याच गावातील सहा हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत.
खालील लिंकवर बघा थरारक व्हिडिओ
https://x.com/BR007__/status/1700947757542855016?s=20
र्डेना शहराची अवस्था बघितली तर केदारनाथमध्ये काही वर्षांपूर्वी आलेला प्रलय आठवेल, अशी स्थिती आहे. र्डेना शहराची लोकसंख्या अवघी १ लाख २५ हजार आहे. पण येथील सध्याचे चित्र बघितले तर केदारनाथ आठवेल. र्डेनामध्ये सर्वत्र कोसळलेल्या इमारती, झाडे, पडझड झालेली घरे, उलटलेली वाहने असे चित्र आहे. याहीपेक्षा भयंकर म्हणजे डोंगरावर, समुद्रात, इमारतींच्या खाली सर्वत्र मृतदेह पडलेले दिसत आहेत. सध्या या पुराचे बळी ३ हजार सांगितले जात असले तरीही हा आकडा १० हजारांच्या वर जाऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.
१२३ जवानही बेपत्ता
पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी तसेच मृतदेह काढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे जवळपास १२३ जवानही बेपत्ता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अद्याप १२ जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
खालील लिंकवर बघा थरारक व्हिडिओ
https://x.com/musakayrak/status/1701321683179626569?s=20
विमानतळे भुईसपाट
डॅनियल वादळानंतर आलेल्या पावसाचा असा काही तडाखा बसला की देशातील जवळपास सगळी विमानतळे उध्वस्त झाली आहेत. याठिकाणी प्रवासी सोडा मालवाहू विमाने देखील उतरू शकत नाही. त्यामुळे पुरामुध्ये विस्कळीत झालेल्या देशाला मदत करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या देशाची यंत्रणा दाखल होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Libya Cyclone Flood 10 Thousand Peoples Missing Disaster