शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के होणार वाढ…मुंबईत नाशिक जिल्ह्यातील या ग्रंथालयाला पुरस्कार

ऑगस्ट 13, 2025 | 7:47 am
in संमिश्र वार्ता
0
सन २०२३ २४ चे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्रदान कार्यक्रम 1 1920x1280 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी ग्रंथालयांना पुस्तकांनी समृद्ध करावे, असे आवाहन करून ग्रंथालयांच्या अनुदानात 40 टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

एसएनडीटी महिला विद्यापीठ, पाटकर सभागृह येथे सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, यंदा ग्रंथ प्रदर्शन माध्यमातून जवळपास ४० कोटी पुस्तकांची विक्री झाली. १० लाख वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. यामध्ये ४ लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथालय चळवळ टिकावी आणि पुढे वाढत जावी यासाठी ‘एक तास शांतता… पुणे वाचत आहे’, ‘१५ दिवसात पुस्तक वाचून परीक्षण लिहिणे’ यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ३ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिले.

वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रदर्शने, पुस्तक परीक्षण, कविता वाचन यासारखे कार्यक्रम राबविण्यात यावीत. ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी मान्यता रद्द झालेल्या २ हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ज्या सार्वजनिक वाचनालयाला 50, 75 व 100 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना विशेष अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रंथालयाचे बळकटीकरण करावे
– विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन चळवळ अधिक समृद्ध केली पाहिजे. ज्या ग्रंथालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांच्या नवीन बांधकामांसाठी अनुदानात शासनाने वाढ करावी तसेच ग्रंथालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा समावेश असावा. आणि पालकमंत्र्यांच्या निधीतील एक टक्के निधी ग्रंथालय चळवळीसाठी द्यावा, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग :
सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे
सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक
ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ
मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक

ग्रामीण विभाग
१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव
२)बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम
३) प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
१) धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
१) श्रद्धा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी

विभागस्तरीय पुरस्कार
१) अमरावती : रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमाननगर, अकोला, ता.जि. अकोला.
२) छत्रपती संभाजीनगर : खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली.
३) नाशिक : राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौद्धवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे
४) पुणे : दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
५) मुंबई : सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार
१) अमरावती : अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा
२) छत्रपती संभाजीनगर : सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर
३)नागपूर : श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल, श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया
४)नाशिक : चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक
५)पुणे : रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा.
६)मुंबई : संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग

ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या समयी पुरस्कार प्राप्त परिचय पुस्तिकेचे व राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सन 2023 च्या मराठी ग्रंथसूचीचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप नाशिक महानगर जिल्हा कार्यकारणीची नियुक्ती जाहीर…या कार्यकर्त्यांला मिळाली संधी

Next Post

राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश….दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 17

राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश….दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011